जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भाऊ चौधरी यांनी काही दिवसापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी फोन चर्चा करून वरणगाव तील परिस्थिती निदर्शनास आणून दिली त्यानंतर पालकमंत्री यांनी तात्काळ दखल घेऊन वरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे तात्काळ लसीकरणाला सुरुवात करा असे आदेश दिले.वरणगाव शहरातील जेष्ठ नागरीकांचा चांगला प्रतिसाद यावेळी लाभला तसेच लसीकरणासाठी खेड्यापाड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर न जाता गावातच लस उपलब्ध झाल्याने नागरीकांमध्ये समाधान आहे लसीकरणा ठीकाणी नागरीकांना येणार्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी, ता.अध्यक्ष दिपक मराठे, मा.नगरसेवक समाधान चौधरी, विष्णु खोले, रविंन्द्र सोनवणे, गणेश चौधरी, सुधाकर जावळे, साजिद कुरेशी अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष पप्पुभाई जकातदार, ओ बी सी तालुकाध्यक्ष मनोज कोलते, ईफ्तेखार मिर्झा शिवसेनेचे जेष्ठ नेते विलासशेठ मुळे, मिलिंदजी मेढे, विलास वंजारी, विजय चौधरी (बाॅक्सर) तसेच डॉ क्षितीजा हेंडवे, अर्चना वासनिक, ईरफान पठान, मनोज तायडे, संपुर्ण वरणगाव ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी व मोठ्या प्रमाणात नागरीक उपस्थित होते..
अखेर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात कोविड- १९ प्रतिबंधक लस वितरण करण्यात सुरुवात....
वरणगाव प्रतिनिधी - सुनील पाचपोळ .
