भारतातील पहिल्या महिला शिक्षीका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांची आज दिनांक दहा मार्च रोजी पुण्यतिथीचा कार्यक्रम सुनगाव येथे ग्रामपंचायत कार्यालया मध्ये संपन्न झाला. सावित्रीबाईंनी संपूर्ण जीवनामध्ये समाजाचा रोष पत्करून स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी घातला. त्यांची साथ दिली ती फक्त महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या कार्याबद्दल त्यांनी केलेल्या कार्यामुळे आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामे करीत आहे त्यानिमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय सुनगाव येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच रामेश्वर अंबडकार, ग्राम विकास अधिकारी टी.जी चौधरी, ग्रामपंचायत सदस्य गजानन दातीर ,राहुल इंगळे,योगिता कुरवाडे ,आशा सेविका गीताबाई बैस, मंदाताई मिसाळ, रेखाताई घोलप ,उज्वला मिसाळ, रेखाताई भगत, स्वातीताई हांडे यांच्यासह ग्रामपंचायत चे कर्मचारी संतोष ताडे,नितेश वसुलकार, सागर उमाळे यांच्यासह उमेश कुरवाडे, बळीराम वसुले उपस्थित होते. या सर्वांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
ग्रामपंचायत सुनगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी...
जळगांव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.