अकोट ग्रामीण पोलिसांच्या चातुर्याने वाटमारीचा केलेला बनाव उघड, फिर्यादीनेच दिली खोटी तक्रार...


 अकोट ता.प्रतिनिधी:-सय्यद शकील.

अकोट शहरा लगत ताजनापूर  मार्गावर  एका कापूस व्यापाऱ्याला अडवून काही अज्ञात चोरांनी विळा दाखवून व मारण्याची धमकी देऊन त्याचे जवळील 646920 रुपये बळजबरीने लुटून नेल्याची फिर्याद दिनांक 9।3।21 रोजी निलेश बापूराव सानप रा.आसेगाव ह्यांनी दिल्या नंतर अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड ह्यांनी त्यांचे सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन तातडीने सूत्र हलविली, ठाणेदारांचा दांडगा जनसंपर्क कामा आला व   माहिती मिळाली की फिर्यादीने दिलेली फिर्यादाच बनावट असून असा कोणताही प्रकार त्या रात्री घडला नाही, हे सूत्र पकडून ठाणेदार ज्ञानोबा फड ह्यांनी फिर्यादीची सखोल विचारपूस केली असता त्यांना फिर्यादीने सांगितलेल्या माहिती बाबत संशय आल्याने व अतिशय कल्पकतेने उलटसुलट विचारपूस केली असता व फिर्यादीचा बनाव उघड झाला व पुढे आलेली हकीकत अशी की ह्यातील  फिर्यादी हा  काही भागीदार मित्रा सह गावातीलशेतकऱ्यां कडून त्यांचा शेतमाल घेऊन त्याची तालुक्याचे ठिकाणी विक्री करून  आलेला नफा सर्व मिळून वाटून घेत व ज्यांचे कडून शेतमाल घेतला त्यांना खरेदी किंमत देत, मागील 5, 6 वर्षा पासून हा व्यवसाय सुरू असल्याने आसेगावातील शेतकरी निलेश सानप ह्यांच्यावर विश्वास ठेवून आपला माल त्यांना विक्री साठी देत असत परंतु सानप ह्यांचे भागीदार मित्राने हिशोब न केल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या फिर्यादीने आसेगावातील काही शेतकऱ्यां कडून कापूस घेऊन त्याची अकोट येथे विक्री करून मिळालेली नगदी  रक्कम 646920 ही रक्कम त्यांचे आडगाव येथील नातेवाईक ह्यांना उमरा फाटा येथे बोलावून त्यांचे कडे दिली व रात्री ही रक्कम आसेगाव येथे घेऊन जाणे धोक्याचे असल्याने उद्या सकाळी रक्कम घेऊन जाईल असे सांगितले व मोटारसायकल ने ताजनापूर- वडगाव रस्त्यावरील हमीद मास्टर ह्यांचे शेताजवळ आल्यानंतर त्याचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल बाजूचे कांद्याचे शेतात फेकून दिला व स्वतः शर्टाचे बटन तोडून  आरडाओरडा केला व आरडाओरडा ऐकून जवळ आलेल्या लोकांना काही अज्ञात लोकांनी मोटारसायकल अडवून विळा दाखवून व मारण्याची धमकी देऊन जवळील 6 लाख रुपये बळजबरीने घेऊन गेल्याचे सांगितले व तशी फिर्याद अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली, फिर्यादीने स्वतः खोटी फिर्याद दिल्याची कबुली देऊन 646920 रु काढून दिले व कांद्याचे शेतात फेकलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल सुद्धा पोलिसांना दाखविला सदरची रक्कम व मोबाइल जप्त  पोलिसांनी जप्त केला आहे वाटमारी सारखा गुन्हा दाखल होण्याचे 24 तासाचे आत सदर गुन्हा उघड केल्याने अकोट ग्रामीण चे ठाणेदार ज्ञानोबा फड व त्यांचे सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.सदरची कार्यवाही मा जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधिक्षक मोनिका राऊत मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी तुकाराम काटे व स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड व त्याच्या सहकाऱ्यांनी केली.

Previous Post Next Post