नागरिकांनी मतदार यादीतील छायाचित्र तपासून घ्यावे - तहसीलदार सैफन नदाफ...


 लोणार ता.प्रतिनिधी:-  संदीप मापारी पाटील 

लोणार तालुक्यातील नागरिकांनी मतदार यादीतील आपले छायाचित्र तपासून घ्यावे असे आवाहन लोणार तहसील चे तहसीलदार सैफन नदाफ यांनी केले आहे दिनांक 1 जानेवारी 2021 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे त्यानुसार दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर कार्यक्रमानुसार ज्या मतदारांची मतदार यादी मध्ये नावे आहे परंतु छायाचित्र नाही अशा मतदारांच्या मतदान केंद्र निहाय याद्या आपले मतदान केंद्र करता नियुक्त केलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे पुरविण्यात आलेल्या आहेत त्यानुसार संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी जे मतदार मतदार यादी मधील नमूद पत्त्यावर राहत नाही मयत मतदार दुबार मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची मतदार यादी भागांमधून नावे वगळणी करण्याकरता मतदार याद्या तहसील कार्यालयास सादर केलेल्या आहेत त्यानुसार सदर याद्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे व www.buldhana.nic.in या वेबसाईटवर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तसेच संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात सुद्धा पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत जर सदर यादी वर काही आक्षेप व हरकत असल्यास दिनांक 30 मार्च 2021 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत उपरोक्त ठिकाणी नोंदविण्यात यावेत असेही आवाहन लोणार तहसील चे तहसीलदार सैफन नदाफ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Previous Post Next Post