चौराकुंड येथे भीषण पाणीटंचाई.ग्रामसेवकाचे दुर्लक्ष


 राजु भास्करे:-अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

धारणी तालुक्यातील चौराकुंड येथे पिण्याच्या पाण्याचे भीषण टंचाई असल्याने महिलांना 1 किमी वरून पाणी आणावे लागत आहे.चोराकुंड येथे 2 पिण्याच्या पाण्याच्या विहिरी असून त्यावर पाणीपुरवठा योजना फिट असून दुसऱ्या विहिरीवर सौर ऊर्जा संच बसवण्यात आले आहे,ती योजना गेल्या 10 ते पंधरा दिवसापासून आजारी असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.ग्रामसेवकांच्या हलगर्जी पणा मुळे नळयोजना बंद आहे. ग्रामसेवक सतत गैरहजर असल्याने ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना सोयीसुविधा पासून वंचित राहावे लागत आहे.शासनाच्या कोट्यावधी रुपयाची योजना ग्रामसेवकाच्या हलगर्जी पणामुळे धूळ खात आहे. दोन दिवसात नळयोजना सुरु न झाल्यास पंचायत समिती समोर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गायन व रघु खडके यांनी दिला आहे.

Previous Post Next Post