धारणी येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या फुटपाथ वर अतिक्रमण वाढलेले असल्याने धारणी नगरपंचायत व पोलीस विभागामार्फत संयुक्त रीतीने फुटपाथ अतिक्रमण हटवीण्याची मोहीम सुरु झाली आहे.मुख्य मार्केटमध्ये दुकानदारांनी आपापल्या दुकानासमोर दुकानाचे सामान ठेऊन मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे.त्यामुळे पार्किंग व वाहणाच्या रहदारीसाठी अडचणी निर्माण होत आहेत परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.दुकानदारांनी आपली दुकानें रस्त्यापर्यंत थाटल्याने अनेक अडचणी निर्माण होतं आल्याने नगरपंचायत ने सकाळी अग्निशामक वाहनाद्वारे सर्व व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. व अकरा वाजे नंतर अतिक्रमण आढळल्यास जप्तीची कार्यवाही करण्याबात सूचना देण्यात आल्या.होळीच्या पर्वावर धारणी मध्ये दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी वाढत असताना वाहनाची रहदारीला अडचण होत असल्याने व त्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नगरपंचायत ने ही मोहीम हाती घेतली आहे.
धारणीत फुटपाथ अतिक्रमण हटाओ मोहीम...
राजु भास्करे:-अमरावती जिल्हा प्रतिनिधी
