जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटी तर्फे मा.राष्ट्रपती यांना तहसीलदार जळगाव जामोद मार्फत निवेदन...


 जळगाव जामोद प्रतिनिधी :-

केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले तीन काळे कायदे रद्द करणे बाबत, पेटोल डिझेल, घरगुती गॅस यावर होत असलेल्या प्रचंड महागाई व दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलनाला पाठींबा देणेबाबत लक्षणीक उपोषण.केंद्र सरकारने मागील काही दिवसांपुर्वी शेती संदर्भात केलेले तीन काळे कृषीकायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. अशी आमची धारणा असून सदरील कायदे रद्द करण्यात यावे व दिल्ली येथे सीमेवर शेतकरी काळ कृषीकायदे विरोधात तीन महिन्यापासुन आंदोलन करीत आहेत. हे आंदोलन हुकुमशाही पध्दतीने चिरडुन टाकण्यासाठी केंद्रसरकार कडुन प्रचंड दडपशाहीचा वापर केल्या जात आहे.सदरच्या तिन्ही काळे कायदामुळे शेतकऱ्यांचे भविष्य उध्वस्त होउन त्यांच्यावर उपासमारीची पाळी येवु शकते. याची संपुर्ण शेतकन्यांना जाणीव आहे म्हणुन मागील काही दिवसांपासुन शेतकरी या तीन काळ्या कृषीकायद्या विरोधात दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत.सदरचे कायदे हे शेतकरी हिताचे नसून उद्योगपतीचे कल्याण फायदा करणारे असून शेतकन्यांची कोंडी करणारे आहेत. तसेच पेटोल, डिझेल,घरगुती गॅसच्या किंमती ह्या गगणाला भिडलेल्या असुन त्यामुळे गोर गरीब जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे.वरील सर्व बाबी संदर्भा आज रोजी जळगांव जामोद तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमाने विद्यमान तहसील कार्यालय जळगांव जामोद येथे शेतकरी संघटनांच्या समर्थनार्थ लाक्षणिक उपोषणास बसलेले असुन मा.महामहिम आपण वरील विषयासंदर्भात जातीने लक्ष देवुन वरील तीन काळे कृषी कायदे त्वरीत रद्द करावे व पेटोल, डिझेल, घरगुती गॅसच्या प्रचंड दरवाढी बाबत कठोर निर्णय घेत त्वरीत दर नियंत्रणात आणावे. अन्यथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल. व त्यापासुन काही विपरीत परिणाम उद्भवल्यास शासन व प्रशासनाची जबाबदारी राहील.निवेदन देतेवेळी अविनाश उमरकर तालुका अध्यक्ष, डॉ स्वातीताई वाकेकर पक्षनेत्या, ॲड ज्योतीताई ढोकणे जिल्हा अध्यक्ष महिला काँग्रेस, सौ चित्राताई इंगळे,राजूभाऊ पाटील, प्रवीण भोपळे, युनूस खान, सुनील येनकर, प्रमोद पाटील, ॲड संदीप मानकर, निशिकांत देशमुख, महेंद्र बोडखे यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post