मनसेचे विदर्भ नेते तथा व युवक कल्याण शॅडो मंत्री विठ्ठल लोखंडकार व त्यांच्या मातोश्री सौ.विजयाबाई बाबुराव लोखंडकार यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देवून आज दि. २६ मार्च रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गणेशपूर येथे कोविशिल्ड लस घेतली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.बी.एस.तेलंग,डाॅ.मोरेश्र्वर गोतरकार, डॉ.प्रियंका बकाल, आरोग्य सहाय्यक एम.डी.शेगोकार, आर.एस.भालेराव, श्रीमती एस.एस.राजपूत,शिक्षक प्रशांत टाक, सुरेश राऊत, गणेश राऊत,निखिल वानखडे,सतिष आटोळे यांची उपस्थिती होती. लसीकरणात बुलडाणा जिल्हा हा कोरोना टेस्ट मध्ये प्रथमस्थानी आहे. तसेच गणेश येथील आरोग्य केंद्र देखील स्वच्छता बाबत सजग असून जिल्हास्तरीय कायाकल्प योजना टीमने या आरोग्य केंद्राला भेट देवून तपासनी केली असता सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्यामुळे समाधान व्यक्त केले. तसेच आरोग्यकेंद्रामध्ये अनेक गरजु रुग्ण येवून योग्य उपचार घेवून समाधानाने परत जातात. त्यामुळे मी सुध्दा माझ्या गावाजवळ असलेल्या गणेशपुर येथीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेतली. व कोरोनाचा वाढवा प्रादुर्भाव पाहता सर्व ज्येष्ठ व व्याधीग्रस्त नागरिकांनी कोविशिल्ड लस घ्यावी असे आवाहन मनसे नेते विठ्ठल लोखंडकार यांनी केले आहे.
मनसे नेते विठ्ठल लोखंडकार व त्यांच्या मातोश्री यांनी घेतली कोरोना लस प्रशासनाला सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन...
खामगाव ता.प्रतिनिधी:-
