जिल्हा केंद्रीय बँकेच्या मोबाईल एटीएम सेवेला आसलगाव येथून प्रारंभ...


  आसलगाव प्रतिनिधी:- 

आर्थिक साक्षरता वाढवणे सोबतच ग्रामीण भागात डिजिटल पद्धतीने बँकींग सेवा देण्यात यावी दृष्टीने जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने पावलं टाकल असून या सेवेला 23 मार्च रोजी आसलगाव येथून प्रारंभ करण्यात आला. केंद्रीय जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक अशी बँकिंग सुविधा देण्याचा प्रयत्न या वेळी करण्यात आला ग्रामीण भागातील बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या आर्थिक व्यवहार गावातच करण्यास मदत मिळणार असून बँकेद्वारे आगामी काळातील पिक कर्ज ही याच माध्यमातून देण्यात बँकेचा प्रयत्न आहे त्यासाठी ही व्हॅन महत्त्वाची भूमिका बजावणार असून त्याद्वारे पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांना एटीएम कार्ड देण्यात येतील  त्यांचे बँक खाते सुध्दा या उपक्रमातून काडण्यात येणार आहेत. डिजिटल पद्धतीने  पैशाची देवाणघेवाण कशी करावी ही सर्व माहिती यावेळी देण्यात आली नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले या सेवेचा फायदा आसलगाव सावरगाव,धानोरा,वडगाव गड मोहिदेपूर,उमापूर, हनवतखेड अशा ग्रामीण भागांना मिळणार आहे.त्यावेळी जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या शाखाप्रमुख मा.मस्के साहेब, मा.प्रकाशसेट ढोकणे, सरपंच सुनील डीवरे उपसरपंच गणेश गिऱ्हे, जी.व्ही देशमुख, एन आर दाभाडे आणि काही नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

Previous Post Next Post