जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव गड ग्रामपंचायतीची निवडणूक दिनांक- ३/३/२०२१ बुधवार रोजी पार पडली. यामध्ये काँग्रेसच्या सौ.उर्मिला रमेश ताकोते सरपंचपदी निवडून आल्या व १३ सदस्य असलेली ग्रामपंचायत वडगाव गड येथे सौ. उर्मिला रमेश ताकोते यांना ९ मते पडली व त्या सरपंच पदावर विराजमान झाल्या तसेच उपसरपंच म्हणून शिवसेनेचे एकनाथ निंबाळकर यांची अगोदरच अविरोध निवड झाली होती.या निवडणुकीत काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बुलढाणा तसेच शिवसेना तालुका प्रमुख तथा नगरसेवक जळगाव जामोद नगर परिषद गजानन वाघ या दोघांचा सिंहाचा वाटा होता. व सर्व महा विकास आघाडी वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेऊन
वडगाव गड ग्रामपंचायत मध्ये महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व ठेवले आहे.तसेच यावेळी उपस्थितांमध्ये. जळगाव जामोद काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश उमरकर. जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जुबेर पटेल. समु जहांगीरदार. अशोक साबे. सुपडा पाटील. दादाराव पाटील. खालिक मौलाना. वकील पटेल. माजी सरपंच तस्लीम पटेल. गजानन भातुरकर. संतोष माजरे. तसेच महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

