जळगांव प्रतिनिधी:-
"शेती माल भरणा करण्यासाठी रेल्वे रँक वाढवून देण्याचे शेतकऱ्यांचे निवेदन" किसान रेल्वेच्या माध्यमातून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितार्थ योजना अमलांत आणली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्यासाठी केंद्र सरकारने किसान रेल्वेच्या माध्यमातून सबसिडी देखील दिलेली आहे. याचा परिपूर्ण फायदा शेतकऱ्यांना होतो आहे. पण सांगोला ते नया आझादपूर येथे व्ही.पी.यु रँक वाढवून देण्याबाबत शेतकऱ्यांच्या मार्फत खासदार रक्षाताई खडसे यांनी विनंती प्रस्ताव सादर केला. तसेच रावेर व निभोरा रेल्वे स्थानकांवर थांबा मिळून व्ही.पी.यु. रँक वाढवून देण्यासंदर्भात डी.आर.एम.शी चर्चा करून निवेदन देण्यात आले. गावातील शेतीमाल इतर राज्यात किंवा इतर जिल्ह्यात विक्री करण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी करोनाच्या काळात किसान रेल्वे सुरु केली. याचा फायदा शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल विकण्यासाठी होऊन त्यांना अधिक उत्पादन मिळू शकले. उत्पादनाची वाढती मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या त्यांचे अधिक उत्पादन परराज्यात किंवा इतर जिल्ह्यात विक्रीसाठी पाठविता येतो. या योजनेचा जास्त लाभ केळी उत्पादक शेतकऱ्यांना व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने सांगोला ते नया अझादपूर यांच्यासह रावेर आणि निभोरा स्थानकांवर रँक खुली करून शेतकऱ्यांना त्यांचा माल भरणा करण्यासाठीची परवानगी मिळावी यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनाही खासदार रक्षाताई खडसे यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले. फळ उत्पादक शेतकऱ्यांना ऐन मागणीच्या काळात शेतीमाल विकता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरित रँक वाढवून द्यावी असे निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या हितार्थ केंद्रातून मदत मिळवून देण्यासंदर्भात खासदार रक्षाताई खडसे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
