मातृभूमीला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी भारत मातेचे सपुत श्री.भगतसिंग, श्री.राजगुरू, श्री.सुखदेव यांना मृत्यू : २३ मार्च १९३१ रोजी हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या २३व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.डिसेंबर १९२८ मध्ये, भगत सिंग आणि त्याचे सहकारी, शिवराम राजगुरू यांनी २१ वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन साँडर्सला लाहोर येथे गोळ्या घालून ठार मारले. जेम्स स्कॉट ह्यांना ठार मारण्याचा हेतू असताना चुकून साँडर्स बळी पडला. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट याने हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय ह्यांच्यावर लाठी चार्जचा आदेश देऊन त्यांना जबर जखमी केले. त्यामुळे लाला लजपत राय दोन आठवड्यांनंतर मरण पावले.त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता. त्याच्या या कटात चंद्रशेखर आझाद व शिवराम हरी राजगुरू सहभागी होते. त्यानंतर भगतसिंग व राजगुरू यांचा शोध घेत असल्याचे पाहून चंद्रशेखर आझाद ह्यांनी चानन सिंघ नावाच्या भारतीय पोलिस अधिकाऱ्याला मारले.त्यांनंतर असेम्ब्ली वर त्यांनी बॉम्ब फेकला होता, त्यांचा उद्धेश त्या वेळेस स्पष्ट होता की असेम्ब्ली वर बॉम्ब फोडणा म्हणजे कोणाची हत्या न करने तर जे लोक देशाच्या स्वतंत्र साठी जे लोक बहिरे आहेत, त्यांच्या साठी हा बॉम्ब फोडला होता. क्रांतिवीर भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू हे तिघे जण हसत हसत मृत्यूला सामोरी गेले. ते शहीद झाले त्यावेळी भगतसिंग आणि सुखदेव अवघे 23 वर्षाचे आणि राजगुरू हे अवघे 22 वर्षाचे होतें. त्यांनी आपल्या देशासाठी आपले सर्वस्व पणाला लावले.शहीद दिवस आठवण करून देतो की आपल्या पिढीला गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळावे या साठी किती हुतात्मांनी आपले प्राण दिले. हे बलिदान देशवासीयांना त्यांची जात,धर्म विचारात न घेता एका सूत्रात बांधून ठेवतो. शहीद दिन भारताच्या तरुण पिढीसाठी अखंड प्रेरणा स्त्रोत आहे.मेरा रंग दे बसंती चोला.. असे म्हणत भारताच्या स्वातंत्र्यसाठी बलिदान देणाऱ्या शहिद श्री.भगतसिंग,श्री.सुखदेव व श्री.राजगुरु यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर वतीने आदरांजली वाहण्यात आली या वेळेस स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे, तसेच कार्यकर्ते उपस्तित होते.
शहीद दिनी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर वतीने शहीद स्मारकास आदरांजली वाहण्यात आली...
शेगाव ता.प्रतिनिधी:-
