बुलडाणा अर्बन परीवाराचा मास्क वाटपाचा अभिनव उपक्रम...


जळगाव जामोद प्रतिनीधी:– 

विविध समाजोपयोगी उपक्रमातून सामाजिक दायित्व जोपासण्याचा प्रयत्न बुलडाणा अर्बन परिवाराच्या वतीने सदैव करण्यात येते.याचाच एक भाग म्हणून गजानन महाराज प्रगट दिनाच्या शुभ पर्वावर तसेच वाढता कोरोना संसर्ग रोखण्याकरीता बुलडाणा अर्बन, जळगांव जामोद विभागा मार्फत स्थानिक शाखेत माननिय राधेश्यामजी चांडक (भाईजी, सर्वेसर्वा बुलडाणा अर्बन), जळगांव जामोद उपविभागीय अधिकारी सौ. वैशाली देवकर, डॉ. किशोर केला (संचालक, बुलडाणा अर्बन), तहसिलदार डॉ. शिवाजी मगर बुलडाणा अर्बनचे जेष्ठ संचालक किसनलालजी केला, गटविकास अधिकारी भारसाकळे साहेब, डॉ.स्वाती केला (मुख्य संयोजिका), पीएसआय धामोळे साहेब, नगराध्यक्षा सीमाताई डोबे,ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. दिपक केदार, नगरसेवक कैलास डोबे, अनंताभाउ देशपांडे, बुलडाणा यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरीता सर्व सामान्यांकरीता व कर्मचाऱ्यांकरिता दहा हजार एन -95 मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांप्रती सामाजिक बांधिलकी जोपासण्याकरीता बुलडाणा अर्बन परीवार सदैव अग्रेसर आहे. असे मा. भाईजी यांनी सांगितले.याप्रसंगी नवनियुक्त पंचायत समिती सभापती रामा राउत व वरवट बकाल येथील नवनियुक्त सरपंच सौ. प्रतिभाताई विजय इंगळे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रीकांत इंगळे यांचा राधेश्यामजी चांडक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.समाजसेवेचे व्रत जोपासणारी एकमेव संस्था म्हणजे बुलडाणा अर्बन ने या आधी सुध्दा मा.भाईजींच्या प्रेरणेने बुलडाणा अर्बन जळगांव जामोद विभागातर्फे रूग्णवाहीका, शववाहीका, तीन शवपेटया सामान्यांच्या सेवेत रूजू आहेत. तसेच जळगांव जामोद सारख्या ग्रामीण भागातील शाखेत 105 कोटीच्या ठेवी आहेत. असे गौरव उदगार डॉ. किशोर केला यांनी काढले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्राचार्य विनायक उमाळे यांनी केले.  याप्रसंगी स्थानिक संचालक गोपाल गोदाणी, सुनिल भैय्या, प्रमोद भंसाली, शाखा व्यवस्थापक संतोष केला व बुलडाणा अर्बन चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post Next Post