मेळघाट मध्ये अवकाळी पावसाचा धिंगाणा...


 राजु भास्करे:-अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यासह विजांचा कडकडाट ने संपूर्ण मेळघाट हादरले असताना गारांनीही  हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली आहे.निसर्गाच्या प्रकोप म्हणायचं की  कर्माच भोग हे न समजणारे कोळे झाले. आहे आधी खरीपचा हंगाम आला तेंव्हा ही निसर्गाने अशीच बेदर्दी दाखवल्याने शेतकऱ्यांचे तेंव्हा ही प्रचंड नुकसान झाले. आणि आता शेतकऱ्यांचा गहू, हरभरा सोंगणीवर आला असताना 75 टक्के गहू काढणे बाकी असताना, व 25टक्के चणा काढणे बाकी असताना काल सायंकाळी धारणीतील कारा, कोट, नांदुरी, कावडाझरी या परिसरात जोरदार गारासह धोधो पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी गहू सोंगून ठेवल्याने त्यावर पाऊस पडला त्यामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे,तसेच सेमाडोह चिखलदरा मार्गांवर गारांचा खच पडला होता. व चिखलदरा येथील. शेख. सलीम यांच्या अंगणातील झाडावर वीज कोसळल्याने सर्व भयभीत झाले आहेत.कावडाझीरी, मोगरदा, कोट, कारा, नांदुरी या परिसरात मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कारा, नांदुरी येथील शेतकरी व कोट येथील दादूजी भाकरे या शेतकऱ्याचे 5 एकरातील गहू सोंगून पाडून आहे त्यावर गारासह पाऊस पडल्याने त्यांचे खूप नुकसान झाले.शासनाने त्वरित पंचनामा करून शासकीय मदत करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Previous Post Next Post