केंद्र शासनाने शेतकरी विरोधी केलेले काळे कायदे रद्द झालेच पाहिजेत या कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटित होऊ नये म्हणूनच कोरोनाचा बागुलबुवा शासनाकडून केल्या जात असल्याचे रोखठोक मत किसन ब्रिगेटचे अध्यक्ष तथा शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे यांनी व्यक्त केले ते हिवरखेड येथे झालेल्या शेतकरी सभेत बोलत होते. पुढे ते म्हणाले की कोरोना हा शासनाच्या सांगण्या प्रमाणे येतो व शासनाच्याच सांगण्याप्रमाणे जातो काय ? पश्चिम बंगाल मध्ये निवडणुका झाल्या सात सात लाख लोकांच्या भरगच्च सभा त्याठिकाणी झाल्या मात्र येथे कोरोना पसरत नाही आणि ईतर ठिकाणी कसा पसरतो असा रोखठोक प्रश यानिमित्ताने शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे यांनी शासनाला विचारला.सभेला ऍड सतीशचंद्र रोठे, किसान ब्रिगेड चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अविनाश काकडे, सुभेदार शेषराव मुरोडिया ,नलिनीताई गावंडे यांची प्रमुख उपस्तीती होती तर प्रनुख्याने हिवरखेड येथील पोलीस पाटील प्रकाश गावंडे,निशान्त शाखा हिवरखेड चे अध्यक्ष डॉ. विनायक बाजारे, संचालक रमेश गुप्ता,सुरेश गिर्हे,सोसायटी सभापती सुरेश कराळे, कॉटन मार्केट संचालक श्यामशील भोपळे,उपसभापती शालीग्राम मोरोकार, संचालक सुधाकर गावंडे, पुरुषोत्तम गावंडे, केशव गावंडे,ग्रामपंचायत सदस्य गजानन बंड, रवींद्र वाकोडे, दिलीप नाठे,जनार्धन पाटील, रमेश गावंडे, प्रमोद मिरगे, माजी उपसरपंच पंकज बाजारे, निशान्त शाखाधिकारी शैलेश जायले, अमोल बाजारे, अमोल गावंडे,सुभाष भगत,उमेश तिडके, विक्की धांडे, संतोष शिंगणे,संजय हिवराळे, इस्त्याक अली, बरकत खा, खालीक जमादार,राजुखान,संतोष शर्मा,विजय राठी,विनोद गावंडे,यांच्यासह पत्रकार संदिप इंगळे, अर्जुन खिरोडकर,गजानन राठोड उपस्तीत होते सभेचे संचालन सागर फुंडकर यांनी केले.
शेतकरी विरोधी काळे कायदे करून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा केंद्र सरकारचा डाव.कोरोनाचा फक्त बागुलबुवाच शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे यांचा घणाघात..
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.
