धारणी शहरात शंकर भगवान आणि गनेशजीचे आगमन....


 राजु भास्करे:-अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

धारणी शहरामध्ये प्रत्यक्ष शिवशंकर भगवान आणि श्री गणपती महाराज यांचे आगमन झाले आहे. दरवर्षी महाशिवरात्री च्या पर्वावर  शिवजीच्या दर्शनासाठी नागरिक आतुरतेने शिवशंकरजी ची वाट पाहतात. तेंव्हा च त्यांच् पण आगमन होते. परंतु यावर्षी महाशिवरात्री च्या पर्वावर त्यांचे आगमन झाले नाही, तर त्यांनी महाशिवरात्री नंतर होळीच्या आधी नुकतेच धारणी शहरात आगमन केले आहे. शिवशंकर भगवान व गणेशजी च्या वेशात दरवर्षी बाहेरील बहुरूपी येऊन लहान मुलांना व श्रद्धा असलेल्या नागरिकांना दर्शन देतात. व आशीर्वाद देतात. घरोघरी जाऊन घरातील प्रत्येकांना दर्शन देतात. लहान मुले आपल्या आईला सांगतात 'आई देवबाप्पा आले'. लहान मुले अतिशय आनंदित होतात.आई वडील ही देवबाप्पाची पूजा करून त्यांना दक्षणा देतात.आणि देवबाप्पा ही आनंदित होऊन पुढे आगमन करतात. अतिशय आनंदाचा व हर्षल्हासाचा क्षण मुलासाठी असतो.

Previous Post Next Post