जळगांव जा.प्रतिनिधी:-
केंद्रातील मोदी सरकारने मागील काही वर्षात गॅस, डिझेल व पेट्रोलची प्रचंड दरवाढ केली. त्यामुळे आज गैस चे भाव 840 रुपये तर पेट्रोलचे भाव ९८ रुपया च्या आसपास आहेत तसेच डिझेल ने सुद्धा नव्वदी गाठलेलीच आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेचे महिन्याचे बजेट कोलमडत आहेत, तर या सर्व वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज जळगाव जामोद येथे *"सायकल मार्चचे”* आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सर्वप्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. तसेच *महिला दिनाचे* औचित्य साधून माँसाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई भीमराव आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले व कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान करण्यात आला.
तदनंतर *"सायकल मार्च"* ला सुरुवात झाली. सायकल मार्च भीम नगर पासून सुरुवात होऊन दुर्गा चौक, तहसिल चौक ते पेट्रोल पंप पर्यंत केंद्र सरकारच्या विरोधात नारे देत राबविण्यात आला. यावेळी सर्व परिसर केंद्र सरकारच्या विरोधात नारे देत काँग्रेस कार्यकत्यानी परिसर हादरून सोडला.
यानंतर तहसील चौक येथे उज्वला गॅस योजनेचे चॉकलेट देणाऱ्या केंद्र सरकारच्या वाढत्या गॅस दरवाढीचा निषेध म्हणून *"चुल पेटवा"* आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी चुलीवर भाकरी थापवून व बेसन करून "बेसन भाकर" आंदोलन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसच्या पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, मा.जि.प.अध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील,महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ. ज्योतीताई ढोकणे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ पाटील, जिल्हा सरचिटणीस युनूस खान, तालुक़ाध्यक्ष अविनाश उमरकर, शहराध्यक्ष अर्जुन घोलप, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष मीनाताई सातव, युवक चे प्रदेश सरचिटणीस अभिजित अवचार, युवक कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पाटील, युवक चे विधानसभा अध्यक्ष शेख अफरोज, युवक चे विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद सपकाळ, मडाखेड चे सरपंच राजुभाऊ शित्रे, नगरसेविका चित्राताई इंगळे, नगरसेवक श्रीकृष्ण केदार व कलीम मिस्त्री, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष निशिकांत देशमुख , जळगाव जामोद युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख राजीक, ग्रा. पं. सदस्य अजय ताठे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष समू जहागिरदार, शहराध्यक्ष राजू मुल्लाजी, हुसेन राही, शेख जुनेद, विनोद धंदर, वसंता धुर्डे, बाळू इंगळे, प्रमोद कोकाटे, राजू शेगोकार, गजानन साबळे, विश्वंभर वावगे, चेतन साबे, बंटी कळसकार, डॉ.शालिग्राम कपले, शेषराव वंडाळे, रामकृष्ण धुर्डे, गोपाल कोथळकार, मोहन बोड़खे, अमोल मानकर, योगेश घोपे, दिनेश काटकर, साहेबराव तायडे, धनजंय बोंबटकार, संतोष इंगळे, दीपक बोंबटकार, अमोल मानकर, मंजूर शेख, देविदास सावरकर, एजाज, समीर शेख, आवेज, इमरान, शफ़ीक़, आरिफ़, अनिल इंगळे, संतोष इंगळे, सचिन बुंदिले, सुनील वानखेडे, मयूर राऊत इ.उपस्थित होते.