दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडिचे वतीने निवेदन...

जळगाव जामोद प्रतिनिधी:-

केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले तीन कायदे रद्द करण्यासंदर्भात दिल्ली येथील गेल्या तीन महिन्यापासून शेतकरी बांधव आंदोलन करीत आहे त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा देऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलन करण्याचे आव्हान केले असता आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद तहसीलदार यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की सरकारने केलेले तीन कायदे हे चुकीचे असुन ते आम्हाला मान्य नसुन ते रद्द करण्यात यावे यासाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे तसेच जळगांव जामोद तालुक्यातील शेतकर्यांना उडिद,मुंग, सोयाबीन व कपाशी असे महत्त्वाचे पिक हातून गेले त्यानंतर तालुक्याची आणेवारी हि ५० पैसेच्या आत असतांनाही पिकविण्याची रक्कम आजपर्यंत शेतकर्यांच्या खात्यात जमा झाली नाही ,विम्याची रक्कम त्वरित शेतकर्यांच्या खात्यात जमा करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले  या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष विजय तायडे, तालुका अध्यक्ष रतणभाऊ नाईक, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव इंगळे, विजयभाऊ पोहनकर,महिला आघाडीच्या नेत्या पार्वताबाई इंगळे, वंदनाताई भगत,अरुणभाऊ पारवे, देवानंद दामोदर, सुनिल बोदडे, सरपंच रमेशभाऊ नाईक , साहेबराव भगत, श्रीकृष्ण गवई, विजय सोनोने,भिमराव हेलोडे, रामकृष्ण तायडे, संतोष तिजारे, रामभाऊ तायडे, महेंद्र वारे, अमोल बांगर,मनोज दामोदर यांचेसह इतर कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

 

Previous Post Next Post