मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये कोरोनाविषाणू प्रादुर्भाव वाढू लागला त्यामुळे जनता कर्फ्यू लावण्यात आले लोकांमध्ये समज गैरसमज होते तसेच हे गैरसमज दूर करणे करिता लोकांमध्ये योग्य अशी माहिती जाणे गरजेचे होते तसेच एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला की त्या व्यक्तीला समाजामध्ये चुकीच्या नजरेने पाहिलं जात होतं किंवा त्याला वाळीत टाकण्याचं काम केलं जात होतं त्या घराशी संबंध तोडले जात होते अशा परिस्थितीमध्ये कोरोनाविषाणू वर नियंत्रण आणणे लोकांना चांगल्या पद्धतीचा उपचार भेटणे आणि प्रशासनाला सहकारी होऊ नये तसेच प्रशासनामध्ये व नागरिकांमध्ये समन्वयाचे काम करणे. covid-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळेज्या लोकांना लागण झाली आहे त्या लोकांचे मानसिक स्वास्थ खचून न देणे त्यांना आधार देणे व योग्य ती माहिती पुरवणे याकरिता फलटण तालुक्यामध्ये ऑगस्ट 2020 मध्ये फलटणचे प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली covid-19 समुपदेशन केंद्र फलटण ची स्थापना करण्यात आली तसेच या समुपदेशन केंद्रामध्ये काही सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व समुपदेशन विषयी माहिती असलेल्या स्वयंसेवकांना एकत्र करून हा प्रकल्प चालवण्यात आला तसेच या प्रकल्पाचा रुग्णांना व नागरिकांना फायदा झाला असे मत प्रकल्प व्यवस्थापक श्री संदीपकुमार जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात केले covid-19 समुपदेशन केंद्र स्थापना निश्चितच प्रशासकीय यंत्रणेला फायदेशीर ठरली, या समुपदेशन केंद्रात काम करणाऱ्या सर्व सेवकांनी निशुल्क काम केले व त्यांच्यावरही असलेला तान दिसून येत होता,प्रशासनामध्ये व नागरिकांमध्ये समन्वय करत रुग्णांना मानसिक आधार देण्याचे काम या covid-19 समुपदेशन केंद्राच्या स्वयंसेवकांनी केले यामुळे प्रशासनावर चा ताण कमी झाला तसेच विशेष बाब म्हणजे covid-19 समुपदेशन केंद्र उभारणी केल्यानंतर तब्बल वीस दिवसांनी केंद्र शासनाने समुपदेशन केंद्राची गरज आहे याकरिता समुपदेशन केंद्र उभी करावीत असा प्रस्ताव पारित केला म्हणजेच फलटण तालुका covid-19 विषाणूच्या वाढत्या संसर्गाला आटोक्यात आणण्याचे सर्व प्रयत्न आपण सर्व करत होता या सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर ,फ्रन्टलाइन वर्कर्स, स्वच्छता कर्मचारी,पत्रकार, स्वयंसेवी संस्था या सर्वांनी चांगल्या पद्धतीने काम केल्याने आपण काही प्रमाणात यशस्वी ठरू शकलो या कामांमध्ये covid-19 समुपदेशन केंद्र फलटण यांचेही काम उल्लेखनीय आहे असे मत फलटणचे प्रांताधिकारी तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव जगताप यांनी व्यक्त केले.covid-19 समुपदेशन केंद्र मागील काही महिने काम करत आहेत आणि आज आपण औपचारिक समारोप व सत्कार समारंभ करिता एकत्रित आहोत परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा वाढतात प्रादूर्भाव पाहता आवश्यकता भासल्यास आपल्याला परत त्याच जोमाने काम करायचे आहे तसेच आपण सर्व पुन्हा एकदा सहकार्य कराल ही अपेक्षा व्यक्त करत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे यांनी व्यक्त केले.यावेळी समुपदेशन केंद्राचे स्वयंसेवक संदीप कुमार जाधव , सुशांत चोरमले, विजय जाधव प्रसाद बिडवे, डॉ. संतोष भिसे, मोनाली गिड्डे,व प्रीती भोजने यांना सन्मानपत्र व औषधी झाडांचे रोप देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशन केंद्राचे समन्वयक सुशांत चोरमले व आभार प्रदर्शन प्रसाद बिडवे यांनी केले
covid-19 समुपदेशन केंद्र कार्य कौतुकास्पद डॉ शिवाजीराव जगताप..
फलटण ता.प्रतिनिधी:-गोविंद मोरे.
