जळगाव जामोद व्यापारी संघटनेमार्फत विविध ठिकाणी करण्यात आले मास्कचे वाटप...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

   कोरोना आजार पुन्हा एकदा वाढण्यास सुरवात झाली . त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रशासनाने काही प्रमाणात लाॕकडाऊन जाहीर केले. परंतु तरीही काही नागरीक विना मास्क फिरतांना दिसतात आणि म्हणून व्यापारी संघटने तर्फे जळगाव जामोद शहरामध्ये दिनांक 9 मार्च 2021 ला जनजागृती करण्यात आली तसेच गरीब मजूर व इतर विना मास्क  फिरणाऱ्या व्यक्तींना मोफत मास्कचे वितरण करण्यात आले . तसेच प्रत्येक व्यापारी प्रतिष्ठानवरती *विना मास्क  दुकानात प्रवेश नाही* अशा प्रकारचे बॅनर लावून मास्क  बद्दल जनजागृती करण्यात आली.   जळगाव जामोद शहरात जुना  भाजी मार्केट , दुर्गा चौक , तहसील ऑफिस समोरील चौक , आंबेडकर चौक येथे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय भाऊ वानखडे,  सचिव चतुर्भुजजी केला,  उपाध्यक्ष गौतमसेठ भंसाली,  कोषाध्यक्ष निलेश सेदानी , संचालक महेंद्रसेठ पलन, राम वर्मा , प्रकाशसेठ सोळंकी,  नारायण महाराज जोशी,  अजय पलन,  जितेश पलन, अनिल भगत , शरद जाधव महेंद्र जोशी यांच्या उपस्थितीत मास्क वाटप करण्यात आले.

Previous Post Next Post