मलकापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई ईनोव्हा,ईर्टिकारसह सात क्विंटल गांजा असा एक कोटी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी ताब्यात, तीन आरोपी फरार.मलकापुर ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी आपल्या पथकासह रात्रीच्या दरम्यान ग्रामीण भागात पेट्रोलिंग करीत असताना मलकापूर ते जांबुळधाबा रोडवर हॉटेल टी पॉईंट जवळ पहाटे तीन वाजे दरम्यान ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मलकापुरहुन बोदवड कडे भरधाव वेगाने येणाऱ्या दोन गाड्यांना पोलिसांनी थांबविले पोलिसांनी गाड्या थांबविताच या दोन्ही गाड्यांमधील चार जण उतरुन पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता एकाला पोलिसांनी पकडले असुन त्याच्या ताब्यातील ईर्टिका क्रमांक TS 27 C 0956,ईनोव्हा क्रमांक AP 28 TC 6255 या दोन्ही गाड्यातुन सुमारे सात क्विंटल गांजा किंमत अंदाजे सत्तर लाख रुपये, ईनोव्हा,ईर्टिका किंमत अंदाजे चाळीस लाख रुपये असा एकूण एक कोटी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंदकुमार चावरीया,अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी,पोलीस उपनिरीक्षक नामदेव तायडे पो.हे.कॉ.सचिन दासर, पो.ना.दिलीप तडवी, राहुल बटूकार, रविकांत बावस्कर, सहाय्यक फौजदार बाळू टाकरखेडे, पो. कॉ. दिपक नाफडे सह आदींनी केली आहे याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस कार्यवाही सुरू होती.
मलकापूर येथे गांजा पकडला दोन कार सह एक कोटीचा मुद्देमाल जप्त एक आरोपी ताब्यात तीन फरार...
मलकापूर ता.प्रतिनिधी:-