सोयगाव तालुका पंचायत समितीवर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम


औरंगाबाद प्रतीनीधी:- गजानन सपकाळ.  

सोयगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या प्रतिभा महेंद्र जाधव यांचा, बिनविरोध विजय झाला. त्यामुळे सोयगाव तालुका पंचायत समितीवर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम राहिले आहेत. रुस्तुलबी पठाण यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नव्याने सभापती निवडीसाठी सोयगाव पंचायत समितीच्या सभापती निवडीची प्रक्रिया पार पडली. प्रारंभी भाजपच्या लता विकास राठोड यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. ऐनवेळी लता राठोड यांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या प्रतिभा जाधव यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या सभापती पदाच्या निवडीकरिता दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.यावेळी गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे , पंचायत समिती सदस्य रुस्तुलबी उस्मान खा पठाण, साहेबराव जंगलु गायकवाड , धरमसिंग दारासिंग चव्हाण,प्रतिभा  जाधव, लता राठोड,संजीवन सोनवणे यांची उपस्थिती होती. विजयाची घोषणा होताच शिवसेनेच्या वतीने पक्ष कार्यालय सेना भवन कार्यालय समोर जल्लोष करण्यात आला. दरम्यान शिवसेनेच्या नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती प्रतिभा जाधव तसेच नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सुरेखाताई प्रभाकर काळे यांचा महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.शहरातील शिवसेना पक्ष कार्यालय सेना भवन येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठाेड,तालुका प्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे,तालुका संघटक दिलीप मचे,शहर प्रमुख संताेष बाेडखे,शिवअप्पा चाेपडे,उस्मानखा पठाण, श्रीराम पाटील, राजमल पवार, अँड.याेगेश पाटील,राधेश्याम राठाेड,भगवान वारुने,रमेश गावंडे,दिलीप देसाई,गजु चाैधरी,माेतीराम पंडीत,कृष्णा गाेळेगावकर,सिताराम जामठीकर आदींची उपस्थिती होती.

Previous Post Next Post