हिवरखेड भीमनगरात गेल्या कित्येक दिवसापासून सांडपाण्याच्या नालीवर पाणीपुरवठा पाईपलाईन उघडी पडलेली असून या पाईपलाईन मुळे होणारा पाणीपुरवठा दूषित होतो, व ते पाणी या दलित वस्तीच्या नागरीकांना प्यावे लागत आहे, त्यामुळे अनेकांचे आरोग्य खराब होत आहे, ही पाईपलाईन बदलण्या करिता येथील नागरिकांनी महिलांनि बऱ्याचदा येथील लोकप्रतिनिधी, वार्ड मेंबर, ग्रामपंचायत याना विनवी केली परंतु कोणीच पुढाकार घेत नसल्याने या नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली, आहे, दलितांच्या वस्ती मध्ये हा असा प्रकार होत असल्याचे उघडीस आले आहे, ही पाईपलाईन खोदकाम करून जर नाही घेतली तर या वस्तीतील नागरिकांना मोठं मोठ्या आजाराच्या सामोरे जावें लागणार असल्याचे समजते, या नागरिकांनी एक आस आणखी नव्या चेहऱ्यावर ठेवली आहे, हे नवीन निवडुन आलेले चेहरे किती दिवसात ही पाईपलाईन बदलून वाड नंबर चार मधील समस्या दूर करतील याकडे या दलित वस्तीतील नागरिकांची नजर लागली आहे,
हिवरखेड दलितांच्या वस्तीतील पाईपलाईन बदला,नालीवर असलेल्या पाईपलाईमुळे होतो दूषित पाणीपुरवठा...
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.
