महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय नामदार श्री अनिल देशमुख यांच्यावर धांदात खोटे आरोप करून त्यांची बदनामी करणाऱ्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री परमबीर सिंग यांच्या आरोपाचा तीव्र निषेध करून त्यांच्यावर कारवाई करणे बाबत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जळगांव तालुका व शहरा च्या वतीने माननीय मुख्य सचिव साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना मा तहसीलदार साहेब जळगांव यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.अनिल देशमुख साहेब स्वच्छ प्रतिमा असलेले नेते आहेत गेल्या अनेक वर्ष ते राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत असून आमदार राज्यमंत्री मंत्री म्हणून त्यांनी शासनातील अनेक खात्यात उल्लेखनीय काम केलेले आहे एक यशस्वी मंत्री म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्र राज्याला आहे तसेच गृहमंत्री म्हणून उत्तम कामगिरी केल्याबद्दल विशेषता कोरणा पार्श्वभूमीवर केलेले कार्य पाहून त्यांच्या कार्याची दखल घेत सकाळ समूहाने त्यांना सन्मानित केले आहे तसेच अंबानी हिरेन मृत्यूप्रकरणी सचिन वाजे याचा सहभाग स्पष्ट होताना व त्याचे धागेदोरे परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहचण्याची शक्यता निर्माण होत असताना स्वतःला कारवाईपासून वाचवण्यासाठी आणि तपासाची दिशा बदलण्यासाठी श्री परमबीर सिंग यांनी बिनबुडाचे तथ्यहीन आरोप केलेले आहे राज्य शासनाची प्रतिमा मलिन करणे गृहमंत्र्यावर तथ्यहीन आरोप करणे त्यांची बदनामी करणे राज्य शासनाच्या विरोधात षड्यंत्र करणे इत्यादी बाबींचा गांभीर्याने विचार करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी आणि राज्य शासनाने त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा तसेच श्री परमबीर सिंग यांनी खंडणीचा जो उल्लेख केला त्याचा या आरोपाचा त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे *उलटा चोर कोतवाल को दाटे* अशातला हा निंदनीय प्रकार आहे तसेच उपरोक्त प्रकरणाची राज्याचे मुख्य सचिव यांनी गंभीर दखल घ्यावी यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगांव शहराच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ.प्रशांत दाभाडे तालुका अध्यक्ष. अ. जहीर शहर अध्यक्ष,अॅड.संदीप उगले, एम साबीर, एझास देशमुख, डॉ अतुल उमाळे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सेल , शेख जावेद, अ. हमीद, संजु ढगे, आसिफ पठाण, यौगेश कुवर, बंटी शंखपाल, गुलाब खान, संजय दंडे, यांच्यासह नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.
गृह मंत्री अनिल देशमुख यांची बदनामी करणार्या पोलीस आयुक्त ला बडतर्फ करा.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगांव शहर व तालुका यांची मागणी....
जळगांव जा.प्रतिनिधी :-
