जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड येथील बलात्काराच्या आरोपातून चारही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याबाबत असे की आरोपी सागर गणेश माडोकार, टिल्ल्या उर्फ प्रविण चंद्रभान भितंगे, संदीप वसंता जवंजाळ, ज्ञानेश्वर प्रभाकर शिवे सर्व रा.मडाखेड खुर्द, ता. जळगाव यांचे विरुध्द पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांनी भा.दं.वि.चे कलम ३७६(ड),३७६(डीए),३७६(२)(जे) (एन),३६३, १०९,५०६ व बालकाचे लैंगिक शोषण कलम ४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार सदरचे प्रकरणात पोलीसांनी आरोपीवविरुध्द वि.जिल्हा व तदर्थ सत्र न्यायाधिश क्र.२ खामगाव येथे दोषारोपपत्र दाखल होते. सदर प्रकरन हे विशेष खटला क्र.८१/२०२० नुसार वि. न्यायालयात चालविण्यात आले. तसेच प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण ४ साक्षीदार तपासाण्यात आले व सदर प्रकरणात वि. न्यायालायाने दि. ०३/०३/२०२१ रोजी आरोपीविरुध्द कोणताही सबळ व परिस्थितीजन्य पुरावा नसल्याने तसेच आरोपीचे वकीलाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन वरील आरोपींची वरील सर्व आरोपींची गुन्ह्यातुन निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश पारीत केलेला आहे. सदर प्रकरणात आरोपीचे वतीने अॅड. मनिष इंगळे,दालफेल, खामगाव यांनी काम पाहिले.
मडाखेड येथील सामूहिक बलात्काराच्या आरोपातून चौघांची निर्दोष मुक्तता.. ..
जळगांव जा.प्रतिनिधी:-