सैन्य, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षा निघाल्यामुळे पत्रकार परिषदेत दिली माहिती... covid-19 च्या प्रादुर्भावामुळे सैन्य,पोलीस आणि इतर स्पर्धा परीक्षा भरतीची प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे सैन्य व पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी हे निराश होत चालले आहे व त्यांच्या या स्थितीमुळे ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असल्याने आज माजी खासदार तथा माजी सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी बुलढाणा येथील विश्राम भवन येथे पत्रकार परिषद घेऊन सैन्य व पोलीस भरती महाराष्ट्र शासनाने लवकर घ्यावी तसेच स्पर्धा परीक्षेची परीक्षा ही लवकर घ्यावी आणि भारतीय सैन्यामध्ये भरती होण्यासाठी 170 इंच उंची केली आहे ती 164 करावी या मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे ..तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले की ,10हजार सैनिक मारल्या गेले पाकिस्तानच्या दहशतवादामुळे.मुळचा पाकिस्तान सरकारचा धंदा जो आहे ड्रग्क्स विकणे आहे. पूर्ण जगामध्ये 90% हीरोइन पाकिस्तान मधून जाते. आता बॉलीवूडच्या भानगडीत बघितलं असेल येथे पाकिस्तान मधून ड्रग्क्स येतात.ड्रग्क्स आणणारे कोण आहे तर ते दहशतवादी आहेत. त्यामुळे दहशतवाद वाढतो, संघर्ष वाढतो,काश्मीर मध्ये मला सांगा तुम्ही एकाही आमदार खासदार ला कोणी मारलं नाही.का नाही ?नॉर्मल सिविलीयन मरतात,सैनिक मरतात 10 हजार सैनिकांना मारलं तर काश्मीर मध्ये का मारल नाही कारण सगळे इन्वॉल आहे.कारण त्यांना राजकीय पक्षांना फायदा होतो.कोणी या विषयावर बोलत नाही आणि म्हणून आमच्यासारखे जे बोलतात ते लोकांना आवडत नाही.आणि पाकिस्तानला संपवल पाहिजे असे मत ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज पत्रकार परिषद व्यक्त केले आहे..
पाकिस्तान ला संपवल पाहिजे-माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत..
बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी:-
