लोणार तालुक्याला कोरोनाचा विळखा.कारेगाव गावात आढळले ३७ रुग्ण


 लोणार ता.प्रतिनिधी:-संदीप मापारी पाटील 

लोणार तालुक्यात मोठया प्रमाणात कोरोनाचे रूग्न आढळुन येत  असताना सुध्दा नागरिक या बाबीला गंभीरतेने घेत नसल्याचे लक्षात येत आहे तालुक्यातील अंजनी खुर्द उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या  कारेगाव या तुलनेने छोट्या असलेल्या गावामध्ये एकाच दिवशी तब्बल ३७ कोरोना रुग्ण आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे . या करिता नागरिकानी कोरोनाचे नियम पाळण्याचे नितात गरज असल्याचे आवाहन तहसिलदार सैफन नदाप यांनी नागरिकाना केले आहे  गेल्या चार पाच दिवसांत या गावातील तापाचे रुग्ण वाढल्याने येथील नागरीकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय स्थानिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला असत शुक्रवारला या गावात कोरोना चाचणी कॅंप आयोजित करण्यात आला होता या कॅंप मध्ये १५० नागरिकांच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यामध्ये तब्बल ३७ नागरीक कोरोना बाधित आढळल्याने संपूर्ण गावच 'कंटेन्मेंट झोन 'मध्ये परावर्तीत करण्यात आल्याचे दृष्य निर्माण झाले आहे  . गावामध्ये आजारी लोकांची संख्या वाढत असल्याचे तसेच कोरोना सदृश्य लक्षणे नागरिकांना दिसत असल्याचे आरोग्य प्रशासना च्या लक्षात आल्याने  तालुका आरोग्य अधिकारी डॉ सानप यांच्या नेतृत्वाखाली , सुलतानपुर वैद्यकीय अधिकारी डॉ प्रल्हाद जायभाये , कोविड केअर व्यवस्थापक डॉ भास्कर मापारी यांच्या मार्गदर्शनात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आणि या गावातील नागरीकांची वेळीच कोरोना चाचणी करण्यासाठी डॉ. अनिता नागरे, डॉ प्रियांका कुकडे , सुमन पवार,आरोग्य सेवक वाघ यांच्या पथकाचि नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आणि त्वरित आमलात आणल्यामुळे या गावातील संभाव्य कोरोनाचा मोठा  उद्रेक आरोग्य प्रशासनाच्या सतर्कतेमुळे निश्चित टळला परंतु अदयापही शहरात तसेच ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा विळखा दिवसेन दिवस वाढत आहे यासाठी नागरिकानी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे कारेगाव  , या गावात सध्या कोविड सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ अनिता नागरे ,आरोग्य सेविका सरदार  , स्थानिक आशावर्कर , आरोग्य यंत्रणेसह ,  तहसील  प्रशासन तळ ठोकून असून गावाचे सरपंच विठ्ठल गुंगे हे त्यांना सहकार्य करीत आहेत, तर  गावातील गर्दीचे ठिकाणे , मंदिरे ,दुकाने पाणवठा यावर गर्दी होऊ नये तसेच सुरक्षित अंतर राखून कोरोना नियमावलीचे जनतेने पालन करावे असे आवाहन तहसीलदार सैफन नदाफ तसेच वैदयकिय अधिकारी डॉ. अनिता नागरे यांनी नागरिकाना केले आहे

Previous Post Next Post