वडशिंगी-जळगांव रोडवर अवैध लाकडे वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनास पकडले...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.

जळगांव जामोद तालुक्यातील वडशिंगी रोडवर दिनांक १६ मार्च रोजी बुलढाणा येथील पथक गस्त  घालीत असताना जळगांव जामोद वनपरिक्षेत्रात गस्त घालीत असताना जळगांव वडशिंगी रोडवर अवैध लाकडांची वाहतूक करताना पांढऱ्या रंगाची बोलेरो पिक अप वाहन पकडण्यात गस्तीवर असलेल्या पथकाला यश आले. गस्तीमध्ये वनपाल एस.डी.इंगळे, व पोलीस नाईक सुनील जाधव यांनी दिनांक १६ मार्च रोजी रात्री १० वाजेदरम्यान  ही कारवाई करण्यात आली. वाहन चालक शेख सोहेल शेख सलीम वय २० वर्ष राहणार जळगांव शहरातील तलावपुरा याकडे अवैध लाकडाबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे कोणतेही कागदपत्रे मिळाली नाहीत. वाहनात ४ लाकडाचे नग मिळुन आले .सदर लाकुड २.२०६ घनमीटर असुन त्याची किंमत २१ हजार १५५ रूपये आहे.लाकडे व बोलेरो पिक अप MH २८ एच ७८९५ किंमत ७० हजार रुपये प्रमाणे वाहन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४  चे कलमान्वये वन अपराध जाहीर करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, सहाय्यक वनसंरक्षक गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली खामगाव चे वनपरिक्षेत्र अधिकारी,वनपाल व पोलीस नाईक करीत आहेत. तसेच अवैध वृक्षतोड अवैध वाहतूक या बाबत तक्ररीची माहिती असल्यास वनविभागास कळविण्यात यावे.असे आवाहन बुलढाणा d.f.o अक्षय गजभिये यांनी केले आहे.

Previous Post Next Post