आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद ला दिल्या व्हायरस किलर मशीन भेट...


 जळगाव जामोद प्रतिनिधी:-

जळगाव जामोद मतदारसंघाचे विकास पुरुष आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रयत्नातून व भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक 22 मार्च 2021 रोजी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे व्हायरस क्लीनर मशीन)भेट देण्यात आली.या मशीनचे वैशिष्ट्य असे की ही मशीन आजूबाजूला राहिल्याने व्हायरस ला हवेतच मारून टाकतात व यामुळे डॉक्टर, नर्सेस तसेच इतर  कर्मचाऱ्यांचा कोरोनाव्हायरस पासून व इतर व्हायरस पासून बचाव होईल ह्या मशीन भविष्यात मतदार संघातील इतर पी एस सी सेंटर मध्ये उपलब्ध करून देण्याचा मानस आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी यावेळी व्यक्त केला. यापूर्वीही ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद ला आमदार कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त व भारतीय जनता पक्षाच्या वतीने पोर्टेबल एक्सरे मशीन व डिजिटल ईसीजी मशीन भेट देण्यात आल्या होत्या. यानंतर आमदार कुटे यांनी लसीकरणा बाबतची माहिती कर्मचाऱ्यांना विचारली तर लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाचा पहिला टप्पा बंद करण्यात आला ही बाब आमदार कुटे यांना समजतात आमदारांनी लसीकरण सेंटर कडे जाऊन तेथील व्यवस्था पाहिली त्यानंतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तर शुक्रवारपासून लस उपलब्ध नसल्याचे समजते बुलढाणा येथील सिव्हिल सर्जन व त्यानंतर लसीकरणा संबंधित अधिकाऱ्यांना आमदार कुटे यांनी भ्रमणध्वनीद्वारे चांगलेच धारेवर धरले व उद्यापासून लसीकरण सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जळगाव जामोद नगरीच्या नगराध्यक्षा सौ सीमाताई कैलास डोबे नगरसेवक निलेश शर्मा तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ शहराध्यक्ष अभिमन्यू भगत सिव्हिल इंजिनिअर परीक्षित ठाकरे,  भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख, डॉक्टर बगाडे,रामदास बोंबटकार, कैलास पाटील, शाकिर खान,बाळु चौव्हाण, मोहन भुजबळ,अजय वंडाळे,उमेश येऊल, पुंडलिक हिस्सल, शरद खवणे, व इतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post