महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत राज्य शासनाच्या अनेक पुरस्कृत अनेक योजना व प्रकल्प राबविले जातात. ह्या योजना किंवा प्रकल्प राबवित असताना अधिकारी किंवा कर्मचारी आपले विशेष वैयक्तिक कौशल्य पणाला लावतात. त्यांच्यात कौशल्य व गुणवत्ता आढळून येते अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येते शासन निर्णय 2 सप्टेंबर 2005 अनिवार्य 2005 2006 पासून हा उपक्रम महाराष्ट्र शासनाने सुरू केला आहे 2019 2020 या वर्षाच्या अशाच गुणवंत अधिकारी कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे त्यापैकी राज्यातील 43 कर्मचारी अधिकारी यांना गौरविण्यात येणार आहे. जळगाव जामोद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप मोरे यांना यंदाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार राज्य शासनाचा जाहीर झाला आहे ते 21 वर्षापासून प्रशासकीय सेवेमध्ये आहेत त्यांनी अतिक्रमण नियमानुकूल 16 फेब्रुवारी 2018 चे शासन निर्णय प्रमाणे सर्व अंमलबजावणी करून एकूण 517 प्रकरणे मंजूर करून एससी आणि एसटीने या प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल मिळून दिले, पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत राज्यातील क्रमांक तीन वर लाभार्थी मंजुरात दिली माननीय राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार सुद्धा झालेला आहे जीपीडीपी आराखडे जिल्ह्यातून सर्वप्रथम अपलोड करणे आपले सरकार प्रियासॉफ्ट अभिलेखे जिल्ह्यातून सर्वप्रथम क्लोजिंग करणे जैव विविधता नोंद व या जिल्ह्यातून सर्वप्रथम सादर करणे आवास योजनेत विभागीय पातळीवर सन्मान जनक स्थिती प्रशासक म्हणून ग्रामपंचायत कुवरदेव ला 2019 2020 ला स्मार्ट ग्राम साठी पात्र करण्यात आले पंचायत समिती स्तरावरील पंचायत विभागाचे 100% लेखा अक्षय निकाली काढण्यात आले जलशक्ती अभियान पाणी फाउंडेशन अभियान लोकसहभागातून कामे करून तालुक्यासह जिल्ह्याचा सुद्धा नावलौकिक मिळवले पारंपरिक पद्धतीने काम न करता ग्रामपंचायतीचे प्रत्येक काम अभियाना नुसार करणे समाजाच्या हिताच्या दृष्टीने लोकसहभागातून विविध उपक्रम राबविणे आदिवासीबहुल गावात शासनाची योजना माहिती करून देणे वाड्या-वस्त्यांवर जनजागृतीचे काम करणे.अशा या गुणवंत अधिकाऱ्यास राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर होतात पंचायत समितीतील सर्व कर्मचाऱ्यांसह विविध गावातील जनसामान्य लोकांना सुद्धा आनंद झाला खरोखरच कामाचे फळ एका होतकरू अधिकाऱ्यास मिळाले याचे समाधान जनसामान्यांना आहे.
जळगाव जामोद पंचायत समितीच्या शिरपेचात मानाचा तुरा विस्ताराधिकारी संदीप मोरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर..
जळगांव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.