जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे *विकास पुरुष आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा वाढदिवस निमित्त रक्तदान शिबिर ,नेत्र तपासणी शिबिर व रोग निदान शिबिराचे* आयोजन करण्यात आले होते .स्थानिक श्री जलाराम महाराज मंदिरात आज दिनांक 9मार्चला रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरासाठी डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीच्या चमूने रक्ताचा संग्रह केला. त्या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी रक्तदानाला उस्फूर्त प्रतिसाद दिला. कोरोना - 19मुळे रुग्णांना आवश्यक असलेले अमूल्य रक्त संग्रहाचे काम रक्तदाते जास्त आसल्याने वेळेअभावी नंतर करण्यात येईल .
*नेञदान शिबीर*
नेत्रतपासणी शिबिरात नेत्रतपासणी तज्ञांनी करून नेञपिडीतांना औषधाचे वाटप व एकोणतीस मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे योग्य रुग्ण निघाल्याने या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल . तत्पूर्वी त्यांची covid-19 तपासणी करण्यात येईल. ह्या प्रसंगी नेत्र तपासणी डॉक्टर कृष्णकांत तायडे व डॉक्टर विजय शिरसाठ यांनी केली .
1111 मास्क वाटप
या शिबिरात येणाऱ्या रुग्णांना व रुग्णांच्या सोबत येणाऱ्या व्यक्तींना राजू मारुती हिस्सल कडून N- 95 चे 1111 मास्कचे मोफत वाटप करण्यात आले .
पोर्टेबल एक्स-रे मशीन व ईसीजी मशीन लोकार्पण
ग्रामीण रुग्णालय येथे भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ , शहराध्यक्ष अभिमन्यु भगत , नगराध्यक्ष सीमा डोबे, डॉक्टर अजित जाधव, तालुका भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष परिक्षित ठाकरे, शहर युवा मोर्चा अध्यक्ष उमेश येऊल,कैलास पाटील, शाकिर खान,बाळु चव्हाण, पांडुरंग मिसाळ,अन्य भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या मशीन डॉक्टर उज्वला पाटील, डॉक्टर दीपक केदार यांना लोक उपयोगासाठी देण्यात आल्या. तसेच वरवट ग्रामीण रुग्णालय व जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात व्हायरस क्लीनर मशीन वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी सुरक्षा म्हणून देण्यात येईल . या कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपाच्या लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.