भुसावळ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मुस्लीम कॉलनीतील इदगा जवळ एका घराची झडती मध्ये अकरा अवैद्य हत्यारे सापडून आले आहेत यामध्ये चार चाकू, चार तलवार, एक रायफल, दोन बंदूक, पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अवैध हत्यार बाळगणारे दोन आरोपी फरार असल्याची माहिती आज भुसावळ पोलिसांनी दिली आहे.भुसावळ बाजारपेठ पोलिसांना खबर यामार्फत अवैद्य बाळगणाऱ्या ची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने भुसावळ पोलिसांनी शहरातील मुस्लिम कॉलनी जवळ असलेल्या इदगा याठिकाणी एका घराची झडती घेतली या घराच्या झडती मध्ये पोलिसांना अवैद्य हत्यारे सापडून आली आहेत ही हत्यारे पोलिसांनी ताब्यात घेतले असून हत्यारे बाळगणारे आरोपी शेख पप्पू व त्याचा मुलगा रिजवान पप्पू शेख हे दोघेही फरार आहेत यांच्याच मालकीच्या पत्राशेड मधून पोलिसांनी हत्यारे ताब्यात घेतले आहेत या दोघांवरती भारतीय दंड संविधान कायद्यानुसार 342 प्रमाणे बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व बाजारपेठ पोलीस स्टेशन मधील पोलीस आरोपीच्या शोधात आहेत.
भुसावळ पोलिसांनी अवैद्य 11 हत्यारे केली जप्त, दोन आरोपी फरार...
भुसावळ तालुका प्रतिनिधी- सुनिल पाचपोळ