आमदार राजकुमार पटेल यांचे हस्ते धदेशाचे वितरण.धारणी पासून जवळच आलेल्या मोखा येथे वीज पडून शंकर धिकार साहेब त्याचे दोन्ही बैल जागीच ठार झाल्याने, त्यांच्या कुटुंबाला आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते चार लाखाचा धंनादेश देण्यात आला.धारणी तालुक्यातील मोखा गावातील शेतकरी शंकर धिकार वय 45 हे बैलजोडी साहेब आपल्या शेतामध्ये डवरणी करीत असताना अचानक पाऊस व विजेचे कडकडाट सुरु झाल्याने शंकर ने काम बंद करून घरी जाण्याच्या बेतात असताना अचानक वीज पडून शंकर सह त्याचे डों बैल जागीच मृत्यू पावल्याने, पोलिसांनी पंचनामा करून तातडीने शव विच्छेदन केले. त्यानुसार महसूल प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्ती विभागाकडून चार लक्ष रुपये मंजूर झाले असून आमदार राजकुमार पटेल यांचे हस्ते धनादेश मृतकाच्या पत्नी श्रीमती शांति शंकर धिकार यांना सानुग्रह नुकसान भरपाइ मदत म्हणून देण्यात आले. तेंव्हा तेथे तहसीलदार अतुल पाटोडे, व प्रकाश घाडगे व गावकरी उपस्थित होते.
मोखा येथील वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला चार लाखाचा अनुदान...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी