हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले...


 वरणगाव प्रतिनिधी- सुनिल पाचपोळ 

तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन.दि. 22 /7/2021- हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सायंकाळी 22.00वाजता धरणाचे 41दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज दि. 22 जुलै रोजी सायंकाळी 22.00वाजता तापी नदीपात्रात 106122क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत. *रात्री पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.

Previous Post Next Post