धारणी तालुक्यात युरिया चा तुडवडा..


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

यावर्षी मेळघाट मध्ये सुरवातीला कमी पाऊस व नंतर समाधानकारक पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांना युरिया चीं आवश्यकता भासत असल्याने,धारणी तालुक्यात युरिया खताचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना युरिया साठी भटकंती  करावी लागत आहे.एकीकडे शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याने काही खाजगी दुकानदार खेड्यापाड्याने युरिया चा काळाबाजार करून बिल न देता शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहेत. तर दुसरीकडे धारणी तालुका सहकारी शेतकरी सोसायटी जवळ धारणी तालुक्यात धारणी, कळमखार, सादराबाडी येथे बफर स्टाक म्हणून 9250 बॅग युरिया उपलब्ध असून तो विकन्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी मनाई केली आहे. त्यासाठी खाजगी दुकानदाराकडे ही युरिया नसल्याने मध्य प्रदेशातून जास्त किंमत देऊन निम्न दर्जाचा युरिया आणावा लागत आहे. यापूर्वी आतापर्यंत यावर्षी तालुका शेतकरी सहकारी सोसायटी मधून 6596 बॅग युरिया विकल्या शेतकऱ्यांना शासकीय दाराप्रमाणाने विकल्या गेले.परंतु यावेळी शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात युरियाची मागणी असून शासनामार्फत परवानगी मिळत नसल्याने खेड्यातील काही दुकानदारामार्फत काळाबाजारी करून तीनशे ते चारशे च्या भावाने विक्री केली जात आहे याकडे कृषी अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.त्यामुळे  काळाबाजार वाढत आहेत व शेतकरी  आर्थिक  संकटात सापडला आहे.तालुक्यात कळमखार व सादराबाडी येथे युरिया साठी  सोसायटी वर तणाव निर्माण होत आहे.

--------------

लवकरात लवकर बफर स्टाक विकण्याची परवानगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सोसायटी द्यावी.v आदिवासी शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्यावा.

सुधीर पटेल (पदाधिकारी )

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी धारणी.

--------------

शासनाकडून परवानगी मिळताच बफर स्टाक मधील युरिया शेतकऱ्यांना पुरवीला जाईल.

लक्ष्मीकांत पटोरकर

अध्यक्ष

धारणी तालुका खरेदी विक्री सहकारी सोसायटी.

--------------

Previous Post Next Post