हिवरखेड लेंडीनाल्याला आला पूर,पूर आल्याने शेजारी राहणाऱ्याचा जीवाला धोका झाला निर्माण,


हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड लेंडी नाल्याला गेल्या पाच वर्षापासून पूर नव्हता आला परंतु या वर्षी  मात्र पावसाळ्यात  पावसाचे सतत सुरू राहणाऱ्या पाण्याच्या वेगाने गावातील  दोन भागाच्या मधातील असलेला लेंडीनाला याला पूर आला असून तेथील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे ,  या लेंडी नाल्यात आधीच विंचू काट्याची भीती असून  पुर आल्याने आणखि धोका वाढला आहे हा पूल गावाच्या मध्य भागी असल्याने गावातील रहिवासी रात्र दिन ये जा करत असतात , हा नाला येथील लोकप्रतिनिधी शासनाच्या योजनेतून बांधून घेतला असता तर आज नागरिकांना नाल्यातून जाण्याची  वेळ आली नसती, या नाल्याला पूर या मध्ये विचू काटा अशा परिस्थितीचा सामना करून येथील रहिवाशांना लेंडीनाल्याच्या शेजारी राहावे लागते,  आता तरी या लेंडी नाल्याचा विकास करा असा आरोह येथील संतापलेले नागरिक करीत आहेत,

Previous Post Next Post