मेळघाट गेल्या अट्ठेचाळीस तासापासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने जामली येथील श्रीमती सोनाय साकु कासदेकर यांचे घर रात्री अचानक कोसळले त्यामध्ये घरातील काही सदस्य जखमी झाले मेळघाट मध्ये गेल्या अट्ठे चाळीस तासापासून सतत धार पाऊस कोसळत असल्याने संपूर्ण जंनजीवन विस्कळीत झाले आहे.नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. बऱ्याच नंदिकाठच्या शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे व दुर्गम भागातील गावांचा संपर्क तुटल्याने जीवन विस्कळीत झाले आहे .पाण्याने सर्वत्र आहाकार माजवीला आहे. घरांची पर झाड होत आहे.जामली येथील श्रीमती सोनाय साकु कासदेकर ही आपल्या नातवंडे सोबत विटामातीच्या घरात राहत होती. मागील आठवड्यात याचं घरी सोनाय चा नातू शालिकराम कासदेकर याची पत्नी सर्पदंशाने मृत्यू झाली होती. व एकाच आठवड्यानतर काळाने पुन्हा झडप मारून ते कुटुंब झोपी गेले असता रात्रीला अचानक घरं कोसळले. त्यात एक नातू जखमी झाले आहे.शासनाने पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई देण्याचं मागणी गावकर्यांनी केली आहे.
जामली येथे अतिवृष्टीने घर कोसळले.
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
