मेळघाट मधील नदी नाले तुडुंब भरुन वाहायला लागले...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

एक महिन्यानंतर पावसाने सुरवात केल्याबर हळूहळू पावसाचा वेगळा वाढल्याने मेळघाट मधील नदीनाले तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत.यावर्षी सुरवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली. व हवामान खात्याचा अंदाज ही या वर्षी भरपूर पाऊस येणार म्हणून असच होता. परंतु मध्यंतरी एक महिना अजिबात पाऊस आला नाही. त्यामुळं काही शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या केल्या तर टेम्बरूसोंडा मंडळ मधील काहींचे पेरलेले बियाणे उत्तम रित्या निघाले,परंतु त्यावर केसाळ अळीने आक्रमण केल्याने अंकुर व काही ठिकाणी पाणासह पूर्ण झाड अस्वल अळीने फस्त केले. तर काही क्षेत्रात रानडूक्कार,रोही यांनी नासाडी केली.त्यामुळे मेळघाट चा तुटपुंजी शेती असलेला कास्तकार चिंतातूर झाला.परंतु गेल्या आठवढ्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावत सर्व रान ओलेचिंब करून बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. व मेळघाट मधील नदिनाले तुडुंब भरून वाहताना दिसत आहे.जंगलामध्ये गुरांना पिण्यासाठी ही पाणी नव्हते.आता भरपूर पाणी झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post Next Post