पठार नदीला आलेल्या महापुरा मध्ये चोहोट्टा बाजार परिसरातील शेतक-यांच्या पिकाचे नुकसान...




 अकोट ता.प्रतिनिधी:- सय्यद शकील.

अकोटतालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरामधिल धामणा बु ,बुधवार मध्य रात्री पडलेल्या पावसामुळे पठार नदीला आलेल्या पुरा मुळे धामणा बु  शेत शिवारात मुग तुर उडीद कपाशी सोयाबीन या पिकांचे  अतोनात नुकसान झालेले आहे तरी धामणा बु येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानाचे ताबडतोब पंचनामे करण्याचे वरिष्ठांनी आदेश द्यावे जेणे करून गरजु शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा शासना कडुन मोबद्ला मिळेल. व शेतकरी अडचणीतुन बाहेर निघेल निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पिकांची या पाण्याने खुप मोठ्या प्रमाणात नासाडी व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे लोक प्रतिनिधी नि सुद्धा लक्ष द्यावे जेणेकरून शेतकऱ्यांच्या हितासाठी शासना कडुन मोबद्ला मिळेल. शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी धामणा बु शेत शिवारातील  शेतकरी करीत आहेत. व तसेच अकोट तालुक्यातील वणी वारुळा परीसरात अतिवृष्टी मुळे मोहाडी नदिला आलेल्या पुराने हजारो हेक्टर जमीन खरडून गेली असुन या नदिच्या पाण्यामुळे पिके पाण्याखाली आले असुन या नदिच्या पाण्यामुळे पिके सडली आहेत तसेच तांदुळवाडी फाट्यावर असलेल्या नाल्यामुळे हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली असुन शेतकऱ्यांनवर फार मोठे संकट आले आहे.वणी वारुळा परीसरात अतिवृष्टी मुळे मोहाडी नदिला गेल्या दोन दिवसांपासून पुर आल्याने या परीसरातील वणी, वारुळा, तांदुळवाडी,सोनबर्डी,आलेगाव,खेर्डा,पिप्रि डिक्कर,बळेगांव येथील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या शेतातुन मोहाडी नदीच्या पात्रातील पाणी शेतात शिरल्या मुळे वणी वारुळा परीसरातील वामनराव वानखडे, भगवंतराव मोहोकार,दिपक पालखडे, रमेश पालखडे, किशोर मोहोकार, ज्ञानेश्वर मोहोकार, दादाराव मोहोकार, भगिरथ पोटे, सोळंके, दिनेश मोहोकार, पंजाबराव पालखडे,बबन पळसपगार,रायबोले,लायसे, प्रविण पोटे, सह असंख्य शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत .सदर पुराच्या पाण्यामुळे हजारो हेक्टर जमीन खरडून गेली असुन तांदुळवाडी फाट्यावर असलेल्या नाल्यामुळे हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे तेव्हा शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा यासाठी खरडून गेलेल्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.या वेळी तलाठी केळकर ह्यांनी पुर परिस्थितीची पाहणी केली आहे.

Previous Post Next Post