चक्क पाण्यातून न्यावा लागला मृतदेह दुसऱ्या गावात अंत्यविधी..

अकोट ता. प्रतिनिधी:- सय्यद शकील

अकोट तालुक्यातील गट ग्राम  पंचायत मुंडगाव अंतर्गत अमिनापूर येथे वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असता. अमिनापूर वासियांना स्मशान भूमी नसल्यामुळे अंतवीधी करिता पाण्यातून बैलबंडी मध्ये मृत्यूदेह मुंडगाव  येथील स्मशान भूमी मध्ये आणावा लागला आहे.अमिनपूर येथिल लिलाबाई जामाजी घनबहादुर वय ९०वर्ष यांचे दि.२४ जुलै  रोजी निधन झाले असता,त्याच्या अंतविधी करिता अमिनपूर येथे स्मशान भुमी कडे जाण्या करिता पावसामुळे रस्ता नसल्या मुळे त्यांचा मृतदेह चक्क  चंद्रीका नदीला कमर येवड पाणी असताना मृतदेह बैल बंडी  मधून मुंडगाव येथिल स्मशान भुमी मध्ये अंतवीधी करिता आणावे लागले,अमिनपूर येथिल स्मशान भुमी कडे जाण्याकरीता पावसात रस्ता नसल्यामुळे मृतदेहाची अंतवीधी करिता दुसरी  कोणतीच व्यवस्था नसल्या मुळे अमिनपूर वासीयांना नाईलाजास्तव मृत देह चक्क नदी पार करुन बैल बंडीतून दुसर्या गावात अंतवीधी करिता न्यावा लागला अशातच मुंडगाव येथिल स्मशान भुमी मध्ये मृतदेह अंतवीधी करिता आणले असता तेथील स्मशान भुमी सुधा पावसात गळत होती.आणी स्मशान भुमी च्या परिसरामध्ये पाणीच पाणी व गाळ साचलेला होता अश्या परिस्थिती मध्ये मृतदेहाची अंतवीधी करण्यात आली मृत देहाचे अंतवीधी शेवटी सुधा मृताची अवहेलना दिसून आली आहे.आम्हाला भविष्यात अश्या कठिण परिस्थिती सामना करण्यात येवू नये याकरिता सबंधीत लोकप्रतिनिधीनी आमची दुर द्श्या लक्ष्यात घेवुन लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनमधून केली जात आहे.

*प्रतिक्रीया*

मी ६० वर्षांचा झालो आहे तरी सुधा आमच्या गावात मी स्मशान भुमी  पाहली नाही आम्हाला पावसात खुप हाल अपेस्टा सहन कराव्या लागत आहेत आज तर वरुन पाऊस चालू असतांना व नदी  नाल्यांना पुर असतांना आमच्या गावात अंतवीधी करिता पर्यायी जागा नसल्यामुळे नदीला आलेल्या पूरामधुन  मृत देह चक्क दुसर्या गावात अंतवीधी करिता न्यावा लागला.

तोताराम सरकटे  नातेवाईक

 

Previous Post Next Post