महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व मनसे नेते विठ्ठलराव लोखंडकार यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 25 जुलै रोजी स्थानिक जळगाव जामोद शहरामधील माळीखेल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्घाटन मदनराजे गायकवाड यांच्या हस्ते पार पडले.या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांनी जळगांव जामोद येथील शासकीय विश्रामगृहात जळगांव जामोद येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की आगामी काळात पक्ष संघटन वाढवुन तसेच जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडा असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. तसेच जळगाव शहरांमध्ये अनेक महिला व पुरुषांनी मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड शिवाभाऊ लंगर,वाहतुक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रतीक लोखंडकार,मनसेचे युवा नेते तथा शहराध्यक्ष नागेश भटकर,मनसे तालुकाध्यक्ष भागवत उगले यांच्या नेतृत्वात मनसेमध्ये प्रवेश घेण्यात आला.तसेच यावेळी जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.या कार्यक्रमा प्रसंगी जळगांव जामोद मनसेचे संजय कोथळकर, शहरउपाध्यक्ष सदाशिव पवार, शहर उपाध्यक्ष दीपक इंगळे, शहर उपाध्यक्ष कुणाल तायडे, शहर संघटक योगेश म्हसाळ, शाखा अध्यक्ष अमित शिंदे, शाखा उपाध्यक्ष गणेश कतोरे, दीपक म्हसाळ सोशल मीडिया प्रमुख यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
पक्ष संघटन वाढवुन पक्षाची ताकत वाढवा-मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड...
जळगांव जा.तालुका प्रतिनिधी:-
