आपल्या महाराष्ट्रामध्ये साधुसंत माणुसकीची शिकवण शिकून गेले .आजही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय अनेक जणांनी आपल्या प्रामाणिकपणा जपवून दाखवून दिला आहे . .अनेक रस्त्यावर पडलेल्या जखमी लोकांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन घेणारे अनेक माणसे आपण बघितली आहे .परंतु मुक्या प्राण्यांनाही वाचवण्याची धडपड अनेक जण करत असतात ...असाच प्रकार सिनखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे दि .23 जुलै रोजी घडला .मलकापूर पांगरा गावाशेजारील सायंकाळी चारच्या सुमारास .काही माकडाचा चा कळप हा आजूबाजूला झाडा वर खेळत होता .त्यामध्ये काही छोटे मोठे माकडचे पिल्लू सुद्धा होती झाडाच्या बाजुलाच मुख्य विद्युत खांब होता. .. माकडे झाडावर खेळत असताना अचानक एक माकडाचे पिल्लू खांबाच्या विद्युततारा वर गेले .व त्या मधून विद्युत प्रवाह वाहत होता .त्यामुळे खांबावरच माकडाचे पिल्लू चिटकले .बाकीचे माकड जोरजोराने किंचाळत होते .झाडाच्या बाजूला शौकत पठाण यांचे शेत होते त्यांना ही बाब दिसून आली त्यांनी त्वरित सामाजिक कार्यकर्ते यांना कळवले . त्यांनंतर शाखेर पठाण . संदिप आटोळे .संतोष आटोळे . समाधान वहिले चांद का पठाण . संतोष आटोळे हे त्वरित हजर झाले त्यांनी क्षणाचाही विलंब न करता .खंबाला चिटकलेल्या माकडाला व्यवस्थित खाली काढले .व माकडाचे पिल्लू जिवंत असल्यामुळे त्यांनी त्वरित गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेले .त्याला दूध पाजले .तेथील परिचारक कैलास गणेशकर .त्यांनी माकडावर उपचार केला .गावच्या शेजारीच माकडाची सेना किंचाळत असल्यामुळे पुन्हा गावाशेजारी त्याला नेण्यात आले .परंतु त्याचा त्याच रात्री माकड मृतावस्थेत आढळले .वन्यप्रेमी यांनी माकड जिवंत राहावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली .त्यावर योग्य उपचार केले .परंतु त्याला यश आले नाही .शेवटी त्यांनी सकाळी माकडावर अंत्यसंस्कार केले ...
विजेच्या खांबाचा शॉक लागून . माकडाच्या पिलांचा मृत्यू !! पिलाला वाचवण्यासाठी वन्य प्रेमींनी केलेली प्रयत्नांची पराकाष्टा !!वन्य प्रेमींनी केले माकडावर अंत्यसंस्कार.
सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
