अकोट तालुक्यातील श्री क्षेत्र वरुर जऊळका येथील योग योगेश्वर संस्थान मध्ये पालकमंत्री श्री बच्चुभाऊ कडू यांनी सदिच्छा भेट दिली.पालकमंत्री बच्चुभाऊ कडू यांचा पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याचा दौरा चालू असताना ह-भ-प श्री गणेश महाराज शेटे यांच्या विनंतीस मान देऊन योग योगेश्वर संस्थान येथे सदिच्छा भेट दिली व श्रींच्या मूर्तीचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी पंडित नेहरू विद्यालयाचे अध्यक्ष श्री पंजाबराव शिरसाठ सर व योगेश्वर संस्थांचे अध्यक्ष ह भ प गणेश महाराज शेटे यांच्या हस्ते माननीय मंत्री बच्चुभाऊ कडू यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व पठार नदीला पूर आल्यामुळे योगेश्वर संस्थांमध्ये पुराच्या पाण्याने प्रवेश केला व बऱ्याच प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे ही माहिती देण्यात आली भविष्यात मंदिरात व गावांमध्ये पठार नदीचे पाणी जाऊ नये याकरिता मंत्री बच्चू भाऊ कडू यांनी पठार नदीचे खोलीकरण करण्याचे आश्वासन दिलेले आहे याप्रसंगी प्रहार पक्षाचे श्री निखील भाऊ गावंडे, कुलदीप पाटील वसु उपस्थित होते. योग योगेश्वर संस्थानमध्ये सरकारने समारंभ प्रसंगी वरुर येथील पंडित नेहरू विद्यालय अध्यक्ष श्री पंजाबराव शिरसाट शिरसाट, मुख्याध्यापक मनवर सर, प्राध्यापक गणेश राव वानखेडे, प्राध्यापक प्रशांत डोईफोडे, प्राध्यापक भास्करराव चक्रनारायण, गोंडचोर सर,कवटकार सर,निखाडे सर,साळुंके सर, गजानन राव कुटेकर सर, संजय खंडारे,संतोष रामेकर, समर्थ पाटील आवारे व गावकरी मंडळी उपस्थित होती ही माहिती अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांच्या वतीने देण्यात आले
मंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन...
अकोट ता.प्रतिनिधी:-सय्यद शकिल.