कोकणातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मा.खा.प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा जिल्हा शिवसेनेकडून जवळपास १४०० क्विंटल अन्नधान्य, किराणा इत्यादी साहित्य कोकणात रवाना.हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारण व २०% राजकारण या तत्वावर चालणारे शिवसैनिक नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असतात.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख मा.श्री उद्धव ठाकरे साहेब यांनी पश्चिम महाराष्ट्र व कोकण आलेल्या महापुरात तेथील जनसामान्य नागरिकांचे अत्यंत नुकसान झाले असून त्यांना या संकटातुन सावरण्यासाठी शिवसेना व युवासेनेने पुढे यावे.गेल्या 2 दिवसात बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार भूमिपुत्र श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा.आ.संजय रायमुलकर, मा.आ.संजय गायकवाड, माजी.आ.डॉ.शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत,म.आ.जिल्हा संघटक आशाताई झोरे,सहसंपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर,युवासेना जिल्हा प्रमुख.ऋषी जाधव,कृषी सभापती राजेंद्र पळसकर, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश त्यात्या वालुकर, युवासेना तालुका प्रमुख भूषण घोडे इ.मिळून चिपळूण वासीयांसाठी अशा संपूर्ण जिल्ह्यातून 1400 क्विंटल तब्बल 13 बस महाकार्गो मधून जीवनावश्यक वस्तु पाठवण्यात आले आहे.यामध्ये मा.खा.प्रतापराव जाधव व मेहकर विधानसभेचे लोकप्रतिनिधी संजय रायमुलकर यांच्या वतीने साखर,गहु,तांदूळ,तेल,मीठ,मिर्ची पावडर,हळद असे 500 क्विंटल सुमारे 16,00870 रुपयांचे जीवनाश्यक साहित्य दिले.यावेळी लखन गाडेकर,शिवप्रसाद ठाकरे,मृत्युंजय गायकवाड़,की.से.उप जि.प्र.बाळासाहेब नारखेडे,शहर प्रमुख.जयचंद भाटिया,युवासेनेचे नंदू कऱ्हाडे,उप.ता.प्र संजय पाटील, ओमसिंग राजपुत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थित होते.
कोकणातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मा.खा.प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा जिल्हा शिवसेनेकडून जवळपास १४०० क्विंटल अन्नधान्य,किराणा साहित्य कोकणात रवाना..
बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत.