मेळघाटात अतिवृष्टीने शेकडो एकर शेती खरडून गेली...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

मेळघाट मध्ये गेल्या तीन दिवसापासून जोरदार मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नदी नाल्या काठचे संपूर्ण शेत जमिनी मध्ये पाणीच पाणी झाल्याने पुरामुळे शेकडो एकर शेतजमीन खरडून गेल्याने  शेतकरी हवालदिल झाला आहे.सतत धार पाऊस व सर्व नदीनाळे तुडुंब भरले त्याच्या बाजूला असलेल्या शेती मध्ये पुराणे उग्र रूप धरण केल्याने धारणी तालुक्यातील खारी, पाथरपूर बिबामाल, रंगूबेली,कोठा, जांभू, चटवाबोड गा गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.त्वरित पंचनामे करून शासनाने मदत करावी अशी मागणी मेळघाट मध्ये होत आहे.

Previous Post Next Post