राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
धारणी पासून जवळच 15 कि मी अंतरावर असलेल्या तातारा गावातील नागरिकांना भरपावसात पिण्याच्या पाण्यासाठी विहं विहीरीजवळ जाण्यासाठी नाल्यात साचलेल्या पाण्यातून डोक्यावर गुंड घेऊन जात संघर्ष करावा लागत आहे.सर्वत्र पाणीच पाणी असून जीवनाश्यक बाबीसाठी सुद्धा पाणी आवश्यक आहे. त्याकरिता गावातील महिला पाण्यासाठी दोन तीन गुंड डोईवर घेऊन पिण्याच्या पाण्याचं एकमेव स्रोत असलेल्या सार्वजनिक विहीरीवरून नाल्यातील गढूळ मिश्रित पाणी आणत आहे. आणि पिण्यासाठी त्याच पाण्याचा उपयोग केला जात असल्याने या गावाकऱ्यावर कधीही साथरॊगाचे संकट येऊ शकते. घरी पाणी आणण्यासाठी गावातील महिलांना कमरिभर नाल्याच्या साचलेल्या पाण्यातून जात संघर्ष करावा लागत आहे.प्रश्नाने या गावातील नारिकांचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी होत आहे.