विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यु जी सी निर्देशानुसार महाविद्यालय व विद्यापीठातील सहायक प्राध्यापक याची शंभर टक्के पदे तात्काळ भरावी...


 सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

शासनाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यूजीसी निर्देशानुसार महाविद्यालय व विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापकांची शंभर टक्के पदे तात्काळ भरावी या मागणीसाठी नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समितीयांच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 22 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये त्यांनी प्रचलित तासिका तत्व तोरण बंद करावेत असे शंभर टक्के भरती होईपर्यंत समान काम समान वेतन या तत्त्वानुसार स्वार्थी नुसार वेतन देण्यात यावे ..तसेच विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्र सरकारच्या निर्देशानुसार परिपत्रक दिनांक 7 व 8 मार्च नुसार आरक्षणासाठी विभाग व विषय एक न मानता विद्यापीठ व महाविद्यालय एक एक माणूस सहाय्यक प्राध्यापक भरती करण्यात यावी ..अशी मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली आहे .तसेच दिनांक नऊ ऑगस्ट क्रांती दिन रोजी .महाराष्ट्रातील सर्व नेट-सेट पीएचडी पात्रता धारकांना .सामूहिक एक आत्मबलिदान करण्यासाठी शासनाकडून परवानगी द्यावी अशी मागणीही यावेळी नेट सेट संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे .तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी 21 निवेदन भेटी आणि एकूण पाच बैठका घेतलेले आहे व आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे तोडगा निघाला नाही .तरी वरील निवेदनाचा विचार करून .विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार महाविद्यालय व विद्यापीठातील सहायक प्राध्यापक यांची भरती करावी अशी मागणी यावेळी निवेदनात केली आहे . .यावेळी नेट-सेट संघर्ष समिती बुलढाणा .जिल्ह्यातील प्रा.प्रवीण सरकटे . प्रा.विकास गवई . प्रा .विजय मापारी .आदी यावेळी निवेदन देताना हजर होते .

Previous Post Next Post