वरणगाव प्रतिनिधी- सुनिल पाचपोळ
पंतप्रधान आवास योजनेचा लाभ वरणगावातील सिद्धेश्वर नगर येथील नागरिकांना मिळावा यासाठी आज माजी नगरसेविका मालाताई मेंढे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव नगरपरिषदेवर महिलांचा मोर्चा काढण्यात आला.वरणगावातील सिद्धेश्वर नगर येथे वीस ते तीस वर्षांपासून विविध जाती धर्माचे लोक राहत आहेत नवीन शासन नियमानुसार अतिक्रमणधारकांना त्यांच्या नावावर ती सदरची जागा शासनाने मोजमाप करून द्यावी व तिथे राहणाऱ्या गरजू व गरीब लोकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी माजी नगरसेविका मालाताई मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर ते दीडशे महिलांचा मोर्चा आज वरणगाव नगरपरिषदेवर काढण्यात आला होता यावेळी मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदनही देण्यात आले ,