वरणगाव येथे नविन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत विकास कॉलनी तील पुर्वीपासुनच्या जलकुंभा शेजारी अगदि फाँन्डेश जवळ नविन जलकुंभा करिता ठेकेदाराने गेली तीन आठवड्यां पासुन खोदकाम करून ठेवले आहे. त्यामूळे सततधार नैसर्गीक प्रवाहाचे पाणी त्या ठिकाणी झीरपत असल्याने तो भर वस्ती मधील उभा असलेला जलकुंभ कोणत्या क्षणी कोसळू शकतो त्यामूळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात असून ठेकेदाराच्या आडमुठे धोरणाचा पालिका अधिकाऱ्यांनी विचार वरून नागरीकांच्या सुरक्षेचे गांभिर्य लक्षात घ्यावे अशी मागणी होत आहे .वरणगाव येथे नविन पाणी पुरवठा योजना मंजूर होऊन ठेकेदारा कडून कार्याला सुरुवात करण्यात आली आहे.पीण्याच्या पाण्याचा सर्व नागरीकांना उपयोग व्हावा या दृष्टीने पालिका स्थरावरून नियोजन करण्यात आले आहे त्याच दृष्टीने वरणगाव नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक.१. मधील वरणगाव फॅक्टरी खरगॉन कडिल पवन नगरात पीण्याचे पाणी पोहचवण्या करीता येथील प्रभाग क्रमाक.३.मधील विकास कॉलनीत जुन्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या एक लाख लिटर पाण्याच्या जलकुंभा शेजारी तत्कालीन सन २००२ मध्ये ग्रामपंचायतच्या कार्यकाळात बांधकाम करण्यात आलेल्या शुद्ध पाणी साठवण्या करिता उपयोगी येणारा ३० हजार लिटरचा 'सम' ठेकेदाराने तोडून त्या जागेवर नविन योजनेतील दोन लाख लिटरचा जलकुंभ बांधकाम करण्याचे नियोजन केले आहे. पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झाली असुन पवननगरकडे जाणाऱ्या मार्गा ने जलवाहीन्या अंथरल्या जात आहेत मात्र विकास कॉलणीत ठेकेदाराचा आडमूठेपणा भोवणार असल्याचे संकेत आहेत गेली तीन आठवडे झाली जून्या जलकुंभा शेजारी अगदि फाँऊण्डेशन उघडे पाडून खोदकाम करून ठेवले आहे सततधार नैसर्गीक प्रवाहाचे पाणी त्या खडडयात मुरत असुन जलकुंभ कोणत्या क्षणी कोसळण्याची शक्यता असल्याने भीती व्यक्त होत आहे . हा जलकुंभ भर वस्थीत असून रस्त्याला लागून आहे . यामूळे मोठिदुर्घटना होण्याचीदेखील शक्यता वर्तवली जात आहे.सदर ठेकेदार वर्क ऑर्डर प्रमाणे काम करत नसुन स्वतःचा आडमुठेपणा वापरत असल्याचा नागरीकांनी आरोप केला आहे पालिका प्रशासनाने यावर अंकुश ठेवणे गरजेचे असुन नागरीकांची सुरक्षा करणे हाच पालिकेचा उद्देश असणे गरजेचे आहे .
वरणगाव नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वरणगाव विकास कॉलणीचा जलकुंभ कोसळण्याच्या मार्गावर ;मोठा अपघात होण्याची शक्यता..
वरणगाव प्रतीनीधी :- सुनिल पाचपोळ