गुरुदेव सेवा मंडळ धारणी तर्फे धारणी येथील सुविख्यात ललित कृषी सेवा केंद्राचे संचालक गौरव जोशी यांचा सात वर्षाचा मुलगा कृष्णा गौरव जोशी व त्याच्यासह त्याचे गुरु त्याचे आजोबा धारनी चे योग गुरुजी ललित जोशी (लाला महाराज)यांच्याही सत्कार करण्यात आला.गुरुदेव सेवा मंडळ तर्फे मेळघाट मध्ये अद्वितीय कौतुकास्पद कार्य करणाऱ्या बालकांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्याची प्रथा आहे.त्यानुषंगाने या वर्षी चा सन्मान धारणी चे कृष्णा जोशी ला देण्यात आले.कृष्णाला भागवत गितेतील संस्कृतचा सोळावा अध्याय मुखपाठ आहे. तसेच तो दररोज सकाळी पाच वाजता उठून आपल्या आजोबासोबत योग प्राणायाम करतो. सूर्य नमस्कार सह विविध धार्मिक उपक्रम करतो.तसेच सायंकाळी जेवनंतर दररोज शतपावली करतो.त्याला पाहुन धारणीतील बरेच युवक आकर्षित होऊन संस्कृत व प्राणायामाचे अनुकरण करीत आहेत.अतिशय कौतुकास्पद कार्य या वयापासून कृष्णा करीत असल्याने गुरुदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी सुभाष येणोरकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनात नातवासह आजोबा ललित जोशी यांना ही सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी डॉ. गोळे, डॉ. खैरकर, प्रा. वंदना येनोरकर, निशा कोल्हे इत्यादी उपस्थित होते.
गुरुदेव सेवा मंडळ तर्फे बालसंस्कारात धारणी येथे कृष्णा जोशी चा सत्कार...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी